"बाबा, परवा कामगारदिनी आमच्या कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर आहे आणि मी रक्तदान करणार आहे."
"अरे बंडू, रक्तदान करू नकोस, ते चांगल नसतं, तुझी तब्येत बिघडेल."
" असं काही होत नाही बाबा, उलट रक्तदान केल्याने रक्ताभिसरण संस्था अधिक कार्यक्षम होते."
"अरे, पण दुसऱ्यांना का रक्त दयायचे?"
"हो, पण मला तुझी काळजी वाटतेय."
"अहो बाबा, त्यामुळे दुसऱ्यांचा जीव वाचतो, यापेक्षा मोठं पुण्य ते काय?"
"बाबा, काही काळजी करू नका, काही होत नाही."
"बरं बंडू, कर रक्तदान. अगं संगीता, तुझ्या शाळेत काय कार्यक्रम आहे का त्या दिवशी ?"
"हो, आम्ही त्या दिवशी ग्रामस्वच्छता करणार आहोत."
" मग आम्ही ग्रामस्थही सहभागी होऊ त्यात."
" तर मग सर्वच गाव स्वच्छ होणार!" आई म्हणाली.