शिक्षक शिक्षण सक्षमीकरण : प्रतिनियुक्ती अर्ज
१७ ऑक्टोबर च्या शासन निर्णय क्र. " डायट ४५१६/(४०/१६) / प्रशिक्षण " नुसार MSCERT ची पुनर्रचना आणि सक्षमीकरण करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षण विभागातील अधिकार्यांना व कर्मचाऱ्यांना, विद्याप्राधिकरण पुणे व प्रादेशिक विद्याप्राधिकरण मध्ये प्रतिनियुक्ती साठी अर्ज करण्याची ही संधी आहे. ह्या पूर्वी ह्या लिंक वर अर्ज केलेल्यांनी अर्ज भरण्याची गरज नाही. तसेच, ज्या व्यक्तींना निवड परिषदेत उपस्थित राहण्याबाबत ई-मेल येईल त्यांनीच वेळेवर उपस्थित राहावे. आपण अर्ज मराठी, इंग्रेजी किंवा हिंदी भाषेत भरू शकता. खालील दिलेल्या रिक्त पदांची माहितीनुसार अर्ज करावे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ डिसेंबर, २०१६ आहे