दुर्गासाखाचा हा आत्तापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांपैकी सर्वात मोठा उपक्रम.सदर कार्यक्रमात ५० विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेने शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतले ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा पुढील सर्व खर्च संस्था करेल तसेच याचवेळी सुमारे २००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे टप्प्याटप्याने वाटप करण्यात आले.जवळपास ४५०० वह्यांचे वाटप केले गेले.

शहापूर तालुक्यातील बोराळा या अत्यंत दुर्गम गावामध्ये हा कार्यक्रम पार पडला.यावेळी सुमारे ५० मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व सुमारे २५० आदिवासी बांधवाना कपड्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी सदर शाळेतील एक विद्यार्थिनी संथेने दत्तक घेतली व तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली.

मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर मुसई वाडी येथील विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले तसेच ही अगली वेगळी संक्रांत तिळगुळ वाटून दुर्गसख्यानी ख-या अर्थाने गोड केली.

डोळखांब परिसरातील कातकरी वाडी येते दुर्गसखा परिवाराने नवीन वर्षाचे स्वागत येथील अत्यंत गरजू विद्यार्थी यांना नवीन कपडे वाटप करून केले यावेळी सुमारे ५० मुले व १०० पालकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.

ह्या कार्यक्रमात सुमारे १०० कुटुंबाना दिवाळीचे फराळ व फटके यांचे वाटप करण्यात आले.विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम मोखावणे गावातील एका कातकरी वाडीवर पार पडला.अनेक दुर्गसख्यानी सण असूनही सर्व कामे बाजूला सारून या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

धसई या गावामध्ये काही होतकरू व सेवाभावी वृत्तीच्या तरुणांनी लहान गाव असूनही एक छोटे वाचनालय सुरु केले.दुर्गसखाने या वाचनालयाला आत्तापर्यंत सुमारे २५००० रुपयांची पुस्तके दिली आहेत.सदर पुस्तके ही अनेक दुर्गसख्यानी घरोघरी स्वत फिरून जमा केली आहेत.

टी.जे.एस.बी बँकेच्या सहकार्याने दुर्गसाखा संस्थेला चार संगणक प्राप्त झाले.सदर संगणकांची दुरुस्ती करून हे संगणक चार शाळांना देण्यात आले.व हा संगणक वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा मानीचा पाडा येथे घेण्यात आला.तसेच इतर तीन संगणक पष्टेपाडा,शिलोत्तर व पडवळपाडा या दुर्गम भागातील शाळांना वितरीत करण्यात आले.आजही या शाळांमधील मुले या संगणकाच्या सहायाने शिक्षण घेत आहेत.या शाळांमधील काही मुलांनी अजूनही ट्रेन पहिली नाही ती मुले संगणक हाताळत आहेत.तसेच आपण संगणक दिलेल्या पष्टेपाडा शाळेतील एक विद्यार्थी यंदा(२०११/१२)प्राथमिक शिषवृत्ती परीक्षेत मेरीटमध्ये आला.

सदर कार्यक्रमात शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील सुमारे २५० अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढे शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले.भर पावसामध्ये हा कार्यक्रम पार पडला.तरीही सर्व दुर्गसख्यानी प्रचंड मेहनत घेवून सदर कार्यक्रम यशस्वी केला.

या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा बेलवली,येथील सुमारे ३५ गरजू विद्यार्थ्यांना लेखन साहित्य ज्यामध्ये कंपास पेटी,वह्या ई. तसेच खेळाचे साहित्य यांचा समावेश होता.याच बरोबर सदर शाळेस एक २१ इंची टी.वी सी.डी प्लेयर,शैक्षणिक सी.डी यांसारख्या वस्तू देण्यात आल्या व सर्वात महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमात इयत्ता ४थीतून पाचवीत जाणा-या ७ मुलांना सुमारे २० हजार रुपयांच्या नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले.कारण या शाळेतून चौथी पास होऊन पाचवीत जाणारा विद्यार्थी रोज सुमारे ६कि.मी ची पायपीट करतो...या विद्यार्थ्यांना व त्यांच्या भावी वाटचालीस गती देणारे हेच  दुर्गासाखाचे पहिले पाऊल.