संकल्प दिन

  (म.ए.सो.) सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत दिनांक १४ जून बुधवार रोजी संकल्प दिन साजरा करण्यात आला.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या माननीय मुख्याधापिका सौ. अनिता नाईक मॅडम यांनी केले.

    कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्या-प्रशालेच्या माजी उपमुख्याध्यापिका माननीय श्रीमती अपर्णा बोकील मॅडम यांचा परिचय प्रशालेतील शिक्षक डॉ. अजिंक्य देशपांडे सर यांनी केला.

    प्रशालेच्या माननीय मुख्याधापिका सौ. नाईक मॅडम यांनी पुस्तकरुपी भेट व पुष्प देऊन मा. अपर्णा बोकील मॅडम यांचे स्वागत केले.

   वक्त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मा. बोकील मॅडम यांनी शिक्षकांचे ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे होय. अभ्यासक्रमाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास साध्य करणे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नाट्यीकरण पद्धत तसेच नवीन innovative मार्गांचा अवलंब करावा. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार तासाच्या सुरुवातीला किंवा तासादरम्यान लहान-लहान activity घ्याव्यात यामध्ये, ओंकार घेणे, small physical activity, laughter yoga घेणे अशा विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांची laughter activity घेतली  

समग्र शिक्षा अभियान-मोफत पाठयपुस्तके वाटप (५वी  ते  ८वी )

                 गरवारे मध्ये पालखी मिरवणूक उत्साहात

                                 संत सप्ताह (22 /6/2023)

सौ. विमलाबाई गरवारे यांना विनम्र अभिवादन!!!

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सौ .विमलाबाई गरवारे प्रशालेत , दिनांक 14 जुलै रोजी सौ.विमलाबाई गरवारे यांच्या  ११२ व्या  जयंतीनिमित्त

 त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळेस

गरवारे फाऊंडेशन ट्रस्टचे श्री. सुनील सुतावणे सर,  प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष श्री. विजय भालेराव सर,

,उपमुख्याध्यापक श्री. संजय जाधव सर ,पर्यवेक्षिका

मार्गसिद्धा पवार मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक  व पारितोषिक पात्र विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. संजय जाधव सर यांनी केले.

सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जन्मदिनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभात माध्यमिक विभागातील शालांत परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना गरवारे फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने प्रमाणपत्र व प्रत्येकी 5000 रुपयांचा चेक देण्यात आला.

प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे

१. स्वराज संजय मोहिते

२.सावंत प्रशांत अरुणकुमार  ३.पुजारी चंदा सायली

 तसेच

माध्यमिक विभागातील प्रथम तीन क्रमांक

१. स्वराज संजय मोहिते

२. रेवती शितल चौगुले

३. अथर्व दिलीप किजबिले

*उच्च माध्यमिक विभागातील  विज्ञान शाखेतील प्रथम  तीन क्रमांक विद्यार्थ्यांना प्रत्येकी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांची नावे

१. सावंत प्रशांत अरुण कुमार

२. जोग मधुरा दत्तात्रय

३. भिलारे स्नेहा विकास

वाणिज्य शाखेतील प्रथम तीन क्रमांक*

१. पुजारी चंदा सायबू

२. यादव मंजुळा सुडल्यी

३. पवार निशिगंधा बंडू

सौ विमलाबाई गरवारे यांच्या जन्मदिनी

उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी

 ज्ञानेश्वरी ने

श्री.आबासाहेबांची सहचारिणी बनून कायम भविष्याचाच वेध घेतला त्या सौ. विमलाबाई गरवारे यांच्या आठवणी जागविल्या .

गरवारे ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील सुतावणे सर यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  

व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनुभवातून शिक्षण घेणे. स्वतःचे छंद जोपासणे. अभ्यासाबरोबरच  इतर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आनंद घेणे .

आणि शिक्षण घेताना संवेदनशील नागरिक ही.  काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.

शाळा समिती अध्यक्ष श्री विजय भालेराव सरांनी असे प्रतिपादन केले की प्रत्येकाला गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेता आले पाहिजे त्याचा उपयोग स्वतःबरोबरच कुटुंब समाजासाठी करवा. असे मत व्यक्त करत , विद्यार्थ्यांचे कौतुक केले

                                  गुरुपौर्णिमा

दिनांक 3/7/2023रोजी या कार्यक्रमातंर्गत 5 वी ते 8 वीतील विद्यार्थ्यांची कथाकथन स्पर्धा घेण्यात आली गुरुपौर्णिमेची माहिती सांगितली गेली.

         सृष्टीबंध बांबूची राखी स्वतः बनविण्याची अनुभूती

सौ विमलाबाई गरवारे प्रशाला, प्रभात रोड येथे आज दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी  मुलामुलींनी

मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राच्या कारागीरानी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राखी किट पासून

स्वतः बांबूची राखी बनविण्याची अनुभूती घेतली.

यातून सर्व मुलांच्या चेहऱ्यावर कृतीशीलतेचा आनंद ओसंडून वाहत होता.

याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ अनिता नाईक, उपमुख्याध्यापक श्री संजय जाधव, पर्यवेक्षिका सौ मार्गसिद्धा पवार उपस्थित होते

कलाशिक्षिका सौ शिल्पा गायकवाड व सौ स्वाती सराफ यांनी पुढाकार घेऊन मुलांना मार्गदर्शन केले.

सौ रसिका लिमये यांनी पर्यावरणपूरक बांबूच्या सृष्टीबंध राखीविषयक माहिती सांगितली.

राख्या बनवून झाल्यावर प्रातिनिधीक स्वरूपात त्या शिक्षक, शिपाईकाका , पालक तसेच विद्यालयाच्या हितचिंतकाना मुलामुलींनी बांधल्या

                    १५ ऑगस्ट 'स्वातंत्र्य दिन' चिरायू होवो!!

 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत   १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने व आनंदात साजरा झाला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन 1984 बॅचचे माजी विद्यार्थी मा. डॉ. पराग काळकर उपस्थित होते. त्यांच्यासमवेत प्रशालेचे महामात्र मा. श्री सुधीर गाडे, शालासमिती अध्यक्ष श्री. विजय भालेराव तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री खेमलापुरे, श्री.भटकाका उपस्थित होते .

कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.डॉ. पराग काळकर यांच्या उपस्थितीत प्रशालेचे सेवक भट काका यांच्या हस्ते

तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

  स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट शासन नियमानुसार प्रशालेमध्ये तिरंगा फडकवण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.डॉ. काळकर यांनी कार्यक्रमात बोलताना शाळेतून मिळालेले संस्कार हीच आपल्या जीवनाची खरी शिदोरी आहे. उज्ज्वल भविष्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत,असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले .

 

 यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध विषयांवरील हस्तलिखितांचे मान्यवरांनी प्रकाशन केले. आजच्या शुभदिवशी असलेल्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन साजरे केले.

प्रशालेचे महामात्र मा.श्री सुधीर गाडे सर यांनी कार्यक्रमात बोलताना  

कवी वसंत बापट यांची "शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट"

 या कवितेचे स्मरण करत.

वसुधैव कुटुंबकमची भावना प्रत्येकाच्या मनात जागवून,भारताने आत्मनिर्भर बनण्याचा संदेश दिला.

त्यानंतर प्रशालेतील संगीत विभागाने 'झंडा ऊँचा रहे हमारा' हे देशभक्तीपर गीत सादर केले.

भारत मातेच्या जयजयकाराने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका साै.अनिता नाईक, उपमुख्याध्यापक श्री.संजय जाधव, पर्यवेक्षिका  मार्गसिद्धा पवार,सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना लडकत यांनी केले.

उत्सव तीन रंगांचा आकाशी आज सजला.

 नतमस्तक मी त्या , साऱ्यांसाठी ज्यांनी भारत देश घडविला.

जय हिंद! जय भारत!

                                 राष्ट्रीय क्रीडादिन

म.ए.सो. सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत 28 ऑगस्ट रोजी  इयत्ता पाचवी ते दहावी सर्व विद्यार्थ्यांसमवेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेत खो-खो शिकवणारे विद्यार्थ्यांच्या आवडीचे तसेच प्रशालेच्या १९७१-७२ बॅचचे माजी विद्यार्थी श्री. अरुण अन्नछत्रे व त्यांच्या सह प्रशालेच्या १९७१-७२ बॅचचे माजी विद्यार्थी श्री. रवींद्र गोडबोले लाभले तसेच प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ.अनिता नाईक मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.संजय जाधव सर, पर्यवेक्षिका मार्गसिद्धा पवार मॅडम उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका  सौ. अनिता नाईक मॅडम यांनी केले.

    प्रशालेतील क्रीडा शिक्षिका सौ. अर्चना लडकत मॅडम यांनी क्रीडा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

प्रमुख पाहुणे मनोगतामध्ये माननीय श्री.अरुण अन्नछत्रे सर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचा इतिहास, हॉकी खेळाच्या सामन्यातील प्रसंग तसेच विद्यार्थ्यांनी खेळाच्या सामन्यामध्ये आत्मविश्वास कसा बाळगावा याविषयीचे मार्गदर्शन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात केले.

                             सैनिक हो तुमच्यासाठी.....

(मएसाे) सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत,

 १ सप्टेंबर रोजी

नैतिक आणि सांस्कृतिक प्रशिक्षण उपक्रम वतीने 21 परमवीर चक्र विजेत्यांचे स्मरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

परमवीर चक्र विजेत्या 21वीर शहिदांना

पुष्पांजली अर्पण करून, अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक

 साै. अनिता नाईक मॅडम, यांनी केले .

पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रशालेच्या शिक्षिका सौ.स्वप्नाली देशपांडे यांनी केले.

इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या 21 विद्यार्थ्यांनी परमवीर चक्र विजेत्या शहिदांची माहिती व चित्तथरारक पराक्रमाची माहिती सांगितली.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केलेल्या ,देश रक्षणासाठी शहीद झालेल्या , शहिदांच्या वीरगाथांचे वर्णन केले.

कार्यक्रमाला, प्रमुख पाहुणे कर्नल नरेशजी गोयल

प्रशालेच्या मुख्याध्यापिका  साै.अनिता नाईक मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.संजय जाधव सर,पर्यवेक्षिका

मार्गसिद्धा पवार मॅडम विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

अशा प्रकारे देश प्रेमाने व, वीरश्रीने भारावलेल्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ.स्वप्नाली देशपांडे

यांनी केले व उपस्थित यांचे आभार मानले.

                               शिक्षक दिन

सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत ५ सप्टेंबर,२०२३ मंगळवार रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात

 प्रतिमापूजन व गुरूस्तवनाने करण्यात आली.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक

 प्रशालेच्या मा.मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक मॅडम यांनी केले.

  श्री.जगन्नाथ भास्कर देवस्थळे व सिंधुताई जगन्नाथ देवस्थळे, यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

 पुरस्कार मूर्तींची नावे पुढीलप्रमाणे-

सौ केशव जाधव

सौ रूपाली डिके

सौ तेजल खाडे

श्री.लौकिक वांजळे

यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 पुरस्कारार्थी मनोगत   पुरस्कारार्थी शिक्षकांमध्ये सौ.  केशर जाधव मॅडम यांनी  प्रातिनिधिक स्वरूपात  मनोगत व्यक्त केले. व पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली.

पाहुण्यांचे मनोगत

श्री .अभिजीत देवस्थळे हे  श्री. अरुण देवस्थळे यांचे सुपुत्र व   श्री .जगन्नाथ भास्कर देवस्थळे यांचे नातू.

 त्यांनी आपल्या  मनोगतातून माझे आजोबा हे हाडाचे शिक्षक होते. त्यांनी पवित्र असे ज्ञानदानाचे कार्य केले. त्यामुळे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ  आदर्श शिक्षक पुरस्कार दिले. जातात याचा आम्हांला अभिमान वाटतो.  

कार्यक्रमाचे अध्यक्ष म ए सो सहसचिव व प्रशालेचे शाला समिती महामात्र श्री सुधीर गाडे सर यानी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला श्री. अभिजीत देवस्थळे

म. ए.सो.चे सहसचिव व शाला समितीचे महामात्र श्री .सुधीर गाडे सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक मॅडम, उपमुख्याध्यापक श्री .संजय जाधव सर ,पर्यवेक्षिका सौ. मार्गसिद्धा पवार मॅडम ,

शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. दीपक खेमलापुरे, पालक सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला . यावेळेस सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा  भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दीपक  खेमलापुरे यांनी केले. प्रशालेच्या विकासासाठी सर्वतोपरी शिक्षक संघ सहकार्य करेल असे आश्वासन दिले.

💐💐💐🙏🙏🙏🙏

मएसो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन जिमखाना, पुणे 4.

         📚'देशभक्तीच्या प्रेरणादायी पुस्तकांची हंडी "📚  (6/9/2023)

 श्रावण महिन्यात येणाऱ्या गोकुळाष्टमी या सणाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे 'दही हंडी '.ही दहीहंडी तर आपण साजरी करतोच, पण ह्या वर्षी आपण विद्यार्थ्यांकडून वेगळ्या प्रकारची दही हंडी साजरी करवून घ्यावे असे वाटले. व "देशभक्तांच्या प्रेरणादायी पुस्तकांची हंडी " प्रशालेत साजरी करण्यात आली. देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या  देशभक्तांच्या व क्रांतीकारकांचा परिचय करून देणारी भरपूर पुस्तके आपल्या ग्रंथालयात वाचनासाठी आहेत. ती विद्यार्थ्यांनी वाचावीत, ती त्यांना माहिती व्हावीत हा त्या मागचा मुख्य उद्देश.  वेगळे काहीतरी पुस्तक हंडी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने  ते शक्य झाले. संस्कारक्षम, बोधपर,  साहस व राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या या देशभक्त  व क्रांतिकारक तसेच राष्ट्रपुरुषांच्या चरित्रात्मक गोष्टींचे वाचन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे.

.     देशाच्या प्रगतीसाठी बौद्धिक,  शारीरिक संपन्नता गरजेची आहे. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी देशभक्तांचे चरित्र रचना सोबतच त्यांच्या अंगी असलेली सहनशक्ती व संयम हा गुणही आपण अंगीकारला पाहिजे.  दहीहंडीच्या निमित्ताने आज आपण पुस्तक हंडी साजरी केली. विद्यार्थ्यांना काल्याचा प्रसादही वाटण्यात  आला.कार्यक्रमाच्या निमित्ताने गोकुळजन्माष्टमी ची माहिती सौ. स्वप्नाली देशपांडे मॅडम ह्यांनी  विद्यार्थ्यांना सांगितली.या कार्यक्रमासाठी आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका  मा. सौ.अनिता नाईक मॅडम, प्रशालेच्या पर्यवेक्षिका  मा. सौ. मार्गसिद्धा पवार मॅडम उपस्थित होत्या.

   सौ. विमलाबाई  गरवारे प्रशालेत गणरायाचे  थाटामाटात आगमन

आज दिनांक 19 सप्टेंबर मंगळवार रोजी सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत मोठ्या थाटामाटात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी शाळेचे पदाधिकारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर प्रशालेतील एनसीसीचे विद्यार्थी आणि वर्ग मंत्रिमंडळातील विद्यार्थी उपस्थित होते. या वर्षी आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष असल्यामुळे गणरायाचे डेकोरेशन मिलेट या संकल्पनेवर आधारित अतिशय उत्तम रित्या साकारण्यात आले आहे. या डेकोरेशन साठी प्रशालेतील कला शिक्षिका सौ. शिल्पा गायकवाड व सौ. सराफ मॅडम, प्रशालेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला

माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेतील गणरायाची आरती

*सौ. विमलाबाई  गरवारे प्रशाला - गणेश विसर्जन सोहळा

आज दिनांक 23  सप्टेंबर शनिवार रोजी  सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. . गणेश विसर्जन कार्यक्रमासाठी शाळेचे पदाधिकारी ,सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर प्रशालेतील सर्व विद्यार्थी, प्रशालेचे ढोल ताशा पथकातील माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेच्या टिपरी पथकासह ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे गणरायाला आवाहन करत गणरायाच्या मूर्तीचे अतिशय मंगलमय वातावरणात विसर्जन करण्यात आले .

प्रशालेतील विद्यार्थ्यांचा विविध मिरवणुकीत सहभाग

शिक्षण प्रबोधीनी आयोजित

अध्यापकांच्या व्यक्तिमत्त्व घडणीसाठी पंचकोश विकसन कार्यशाळा

दि.14/10/2023

वार - शनिवार

स्थळ - प्र. ल. गावडे सभागृह

         बदलत्या काळानुसार सर्व शिक्षक अद्ययावत राहण्यासाठी, त्यांच्या सृजनशीलतेला प्रबलन मिळावे यासाठी व एकूणच अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सतत नाविन्यतेला वाव मिळून त्याचा फायदा या प्रक्रियेतील प्रत्येक घटकासाठी व्हावा यासाठी शिक्षण प्रबोधिनी तर्फे नियमितपणे विविध कार्यशाळांचे आयोजन केले जात असते. आज झालेल्या अध्यापकांच्या व्यक्तिमत्त्व घडणीसाठी पंचकोश विकसन कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून गुरुकुल ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे विभाग प्रमुख मा.श्री.आदित्य शिंदे सर लाभले होते.

 आरोग्य - कौशल्य - जिव्हाळा - विवेक - कृतज्ञता हे पंचकोश अध्यापकांसाठी कसे महत्वाचे आहेत हे अनेक चपखल उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले. पंचकोशापैकी आरोग्य या  कोशाला त्यांनी विशेष प्राधान्य देऊन त्याचे महत्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांबरोबर काम करताना अध्यापकांची ऊर्जा दिवसभर टिकून राहणे खूप महत्वाचे आहे हे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.  गुरुकुल मध्ये राबवत असलेल्या अनेक उपक्रमांबद्दल माहिती त्यांनी या वेळी दिली. त्यांनी कार्यशाळेच्या सुरुवातीला 20 मिनिटे देऊन घेतलेला मौनाअभ्यास खूप काही शिकवून गेला.

     म. ए.सो शिक्षण प्रबोधिनीचे अध्यक्ष मा.श्री. राजीव हाजीरनीस तसेच सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेचे शालासमितीचे अध्यक्ष  मा. श्री. अजय पुरोहित या  कार्यशाळेस उपस्थित होते. कार्यशाळा संकुल स्तरावरील असल्याने पुण्यातील भावे हायस्कूल, रेणुका स्वरूप प्रशाला, बालशिक्षण मंदिर व सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेतील सर्व शिक्षक व शाळांचे मुख्याध्यापक या कार्यशाळेस उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. वाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.मुख्याध्यापिका श्रीम. नाईक यांनी केले तर वक्त्यांचा परिचय श्रीम.लडकत यांनी करून दिला. आभार प्रदर्शन मा.उपमुख्याध्यापक श्री. जाधव सर यांनी केले.

म ए सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डेक्कन जिमखाना पुणे.

 वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने.........📚📚📚📚📚

💐💐आपणा सर्वांना वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून २०१५ पासून त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालयांमधून १५ ऑक्टोबर हा दिवस "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे महत्व समजावे हाच या वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश आहे. डॉ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते.

या मंगल दिनानिमित्त सर्वांनी मिळून संकल्प करूया नियमित वाचन करूयात आणि आपले जीवन समृद्ध करूया.

प्रशालेत आजोबा आजी कृतज्ञता दिवस साजरा करण्यात.

   

कै.पद्मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र                                                                                               अभिवादन

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत विख्यात उद्योजक डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांना आज गुरुवार, दि.२ नोव्हेंबर २०२3 रोजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. म.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे सदस्य आणि गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी मा. श्री. सुनील सुतावणे, म.ए.सो.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर, यांच्या हस्ते डॉ. आबासाहेब गरवारे आणि सौ. विमलाबाई गरवारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. अनिता नाईक मॅडम , मा.उपमुख्याध्यापक श्री.संजय जाधव सर, मा.पर्यवेक्षिका  श्रीम.मर्गासिद्धा पवार मॅडम आणि प्रशालेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली.

                               भोंडला दिनांक २०/१०/२०२३

दिनांक आठ नोव्हेंबर बुधवार रोजी सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत सकाळी आठ ते दहा या वेळात अनौपचारिक पद्धतीने दीपोत्सव साजरा झाला .

विमलाबाई गरवारे प्रशालेच्या शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री पुरोहित सर आणि महामात्र श्रीयुत गाडे सर यांनी दिवाळीची पहिली पणती लावून दीपोत्सवाचे उद्घाटन केले .त्यानंतर प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ नाईक मॅडम उपमुख्याध्यापक माननीय श्री जाधव सर व पर्यवेक्षिका माननीय सौ पवार मॅडम यांनी देखील दिवाळीची पणती लावून दीपोत्सवाची रंगत वाढवली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले ग्रीटिंग कार्ड, आकाश दिवा सर्व मान्यवरांना देऊन दीपोत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला. प्रशालेच्या शाळा समितीचे महामात्र श्री  गाडे सर यांनी विद्यार्थ्यांना किल्ले बनवा, मस्त दिवाळी आनंदात साजरी करा अशा अनौपचारिक शब्दात दिवाळी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन आणि सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले त्यामुळेच कार्यक्रम आनंदात साजरा झाला

दिनांक 19 नोव्हेंबर 2023 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत संस्था वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला

 याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य माननीय भालेराव सर , सौ विमलाबाई गरवारे प्रशालेच्या शाळा समितीचे नूतन अध्यक्ष माननीय श्रीयुत पुरोहित सर, प्रशालेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

कणाकणाने व गुणागुणाने वाढत जाणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी गुणवत्तेच्या दृष्टीने देखील विकसित होण्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे त्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता व नवीन येऊ घातलेल्या एन ए पी शिक्षण प्रणालीचा अंगीकार आपण केला पाहिजे असे प्रतिपादन माननीय श्रीयुत भालेराव सरांनी व्यक्त केले

तसेच मराठी माध्यमाच्या शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू यात असे मत शाला समिती अध्यक्ष श्रीयुत पुरोहित सरांनी व्यक्त केले. प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ अनिता नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व संस्था वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशालेच्या शिक्षिका सौ नलिनी पवार यांनी महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचा इतिहास अतिशय सविस्तरपणे उलगडून  सांगितला

त्याचप्रमाणे प्रशालेच्या शिक्षिका सौ स्वप्नाली देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या समवेत ईशस्तवन व मऎसोगीत सादर केले

 कार्यक्रम अतिशय नीटनेटका व उत्साहात पार पडला.

26नोव्हेंबर संविधान दिन

संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देवून संविधानाचे वाचन करण्यात आले.

    ‘महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी’

       दिनांक: २८ नोव्हेंबर २०२३

     आज समाज सेवक आणि थोरपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे. महात्मा फुले यांच्या जीवनाशी निगडित काही गोष्टी जाणून घेऊ या.ज्योतिबा फुले महान क्रांतिकारी, भारतीय विचारक, समाजसेवी, लेखक व दार्शनिक होते. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली पुण्यात झाला होता.

 

2. ज्योतिबा यांचा पूर्ण कुटुंब फुलांचे गजरे बनवण्याचे काम करीत होते यामुळे त्यांच्या कुटुंबाला फुले या नावाने ओळखले जात असे. ज्‍योतिबा केवळ एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे देहांत झाले होते.ज्‍योतिबा फुले यांनी काही काळ मराठीत अभ्यास केला नंतर शिक्षण सुटलं आणि नंतर वयाच्या 21 वर्षात त्यांनी इंग्रजीत सातवी या वर्गाचा अभ्यास सुरू केला.अभ्यास केला नंतर शिक्षण सुटलं आणि नंतर वयाच्या 21 वर्षात त्यांनी इंग्रजीत सातवी या वर्गाचा अभ्यास सुरू केला.

4. महात्मा फुले यांचा विवाह 1840 साली सावित्री बाई यांच्यासोबत संपन्न झाला होता.

5.  स्त्रियांची अवस्था सुधारण्यासाठी आणि समाजात त्यांना ओळख प्रदान करण्यासाठी त्यांनी 1854 मध्ये एक शाळा उघडली. ही शाळा देशातील पहिली अशी शाळा होती जी मुलींसाठी उघडण्यात आली होती. मुलींना शिक्षण

 देण्यासाठी शिक्षिका नसल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला या योग्य बनवले. काही लोकांना सुरुवातीपासूनच त्यांच्या कामात अडथळे घातले. लोकांनी त्यांच्या वडिलांवर दबाव टाकून त्यांना पत्नीसह घरातून बाहेर हाकवले तरी ज्‍योतिबाने हिंमत सोडली नाही आणि मुलींसाठी तीन-तीन शाळा उघडल्या.

6. गरीब आणि निर्बल वर्गाला न्याय देण्यासाठी ज्योतिबाने 'सत्यशोधक समाज' स्थापित केले, त्यांच्या समाज सेवेने प्रभावित होऊन 1888 मध्ये मुंबईच्या एक सभेत त्यांना 'महात्मा' या उपाधीने अलंकृत करण्यात आले.

7. ज्योतिबा यांनी ब्राह्मण-पुरोहित यांच्या मदतीविना विवाह-संस्कार आरंभ करवले आणि मुंबई हायकोर्टाकडून मान्यता मिळवली. ते बाल-विवाह विरोधी आणि विधवा-विवाहाचे समर्थक होते.

8. त्यांनी दलितांच्या प्रगतीसाठी अनेक कार्य केले. त्यांनी दलित मुलांचे घरात पालन-पोषण केले. परिणामस्वरूप ते जातीतून बहिष्कृत केले गेले.

 9. ज्योतिबा फुले आणि त्यांचं संघटन सत्‍यशोधक समाजाच्या संघर्षामुळे सरकाराने एग्रीकल्‍चर एक्‍ट पास केले.

 10. महात्मा ज्‍योतिबा फुले यांनी वयाच्या 63 व्या वर्षी 28 नोव्हेंबर 1890 ला पुण्यात आपले प्राण त्यागले.

 अशा महान शिक्षणतज्ञास थोर समाज पुरुषास विनम्र अभिवादन.

   विद्यार्थ्यांना online माहिती देण्यात आली.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन.

                                                      दिनांक: ६ डिसेंबर २०२३  

  सहा डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन प्रथमतः त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.

          भारतीय स्वातंत्र्यलढयामधील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होते, तसेच ते थोर समाजसुधारक म्हणून देखील ओळखले जातात. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा त्यांचा संदेश आजच्या पिढीलाही तितकेच गरजेचे आणि आदर्श वाटतात.त्यांनी भारतातील समाजातील तळागळातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या ऐतिहासिक समारंभात आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 64 वर्ष, 7 महिने होते. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यूनंतरची मुक्ती असा होतो, म्हणूनच त्यांचा स्मृतिदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो.

या महान आत्म्यास त्रिवार अभिवादन!

 शालेय पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२४

क्रीडा महोत्सव उद्घाटन

दिनांक १५  डिसेंबर २०२३ वार शुक्रवार रोजी क्रीडा महोत्सवाचे  उद्घाटन मा.मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले.

इयत्ता ५ वी ते १० वी वैक्तिक व सांघिक स्पर्धा

दिनांक १५.१२.२०२३ ते १८.१२.२०२३ पर्यंत  घेण्यात आल्या.

" शांतता पुणेकर वाचत आहेत......... पुणेकरांचा एक तास वाचनासाठी. "

                                                        दिनांक:१४ डिसेंबर २०२३.

 

म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन जिमखाना पुणे 4

" शांतता पुणेकर वाचत आहेत......... पुणेकरांचा एक तास वाचनासाठी. "

 पुणेकरांच्या वाचन मोहिमेतून विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी दिनांक 14 डिसेंबर दुपारी 12 ते 1 या वेळात एक तास जिथे असाल तिथे करा वाचन या अभिनव उपक्रमा अंतर्गत आपल्या सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेतील विद्यार्थी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. भारमळ सर, उपमुख्याध्यापक श्री. जाधव सर तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर सहकारी यांनी देखील  एक तास वाचन करून ऐतिहासिक ठरणाऱ्या या उपक्रमात आपल्या  प्रशाळेचा सहभाग नोंदविला आहे.

       सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला,पुणे-४.

             विविध गुणदर्शन कार्यक्रम

         दिनांक 20 डिसेंबर  रोजी प्रशालेत इ.5वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोकधारेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

    महाराष्ट्रातील विविध भागातील नृत्य प्रकारांचा यामध्ये समावेश होता. विद्यार्थ्यांनी कोळीनृत्य, शेतकरी नृत्य, गोंधळ, गवळण, मंगळागौर, शिवाजी महाराजांची शौर्यगीते असे विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर केले. समूहगीत व पोवाडे देखील यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रशालेमध्ये कार्यरत असणाऱ्या गायन विभागातील बालचमुंकडूनदेखील  गीत सादर करण्यात आले. मुलांचे मनोबल व आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी विविध गुणदर्शन कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात येतो.

     कार्यक्रमावेळी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. भारमळ सर मा. उपमुख्याध्यापक श्री.जाधव  सर तसेच स्नेहसंमेलन शिक्षक प्रतिनिधी सौ. कौलगुड मॅडम व सौ.सराफ मॅडम उपस्थित होते.

म.ए.सो.ची सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

   गुरुवार दि. 21 डिसेंबर रोजी म.ए.सो.ची सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या थाटात साजरा झाला.

     वर्षभरातील विविध परीक्षा, विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धा, बाह्य परीक्षा, तसेच शालांत परीक्षेत उज्ज्वल यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा वार्षिक पारितोषिक समारंभाचे आयोजन करून एकप्रकारे कौतुकाची थापच देत असते. यानेच पुढे उत्तुंग यश संपादन करायला विद्यार्थ्यांना बळ मिळते.

   उद्योजक व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कै.आबासाहेब गरवारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रशालेत दरवर्षी आयोजिलेली उद्योजक मुलाखत स्नेहसंमेलनाचा आकर्षण बिंदू असते. यावर्षी प्रशालेचे माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक श्री. विनायक जोगळेकर यांचा मुलाखतीच्या माध्यमातून  विद्यार्थी ते एक यशस्वी उद्योजक हा त्यांचा प्रवास अलगद उलगडला.  विद्यार्थ्यांना यातून उच्चशिक्षण घेण्याची तसेच उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळाली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री.रोहिदास भारमळ यांनी केले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.पुरोहित सर, प्रशालेचे मा.उपुख्याध्यापक श्री.जाधव संजय, शिक्षक स्नेहसंमेलन प्रतिनिधी सौ. कौलगुड मुक्ता, सौ.सराफ स्वाती, डॉ.अजिंक्य देशपांडे, श्री. भट काका तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, 10वी -12वी चे विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कौलगुड यांनी केले.

रथसप्तमी

 शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी रथसप्तमी निमित्त प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. भारमळ सर, पर्यवेक्षिका सौ. मार्गसिद्धा पवार मॅडम यांच्या उपस्थितीत प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सूर्यनमस्कार घातले. इयत्ता पाचवी ते नववी चे एकूण 546 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी एकूण 6552 सूर्यनमस्कार घातले.

*म.ए.सो. सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत शिवजयंती उत्सव

दिनांक19/02/2024 सोमवार रोजी म.ए.सो. सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री भारमळ रोहिदास, पर्यवेक्षिका सौ पवार मार्गसिद्धा, वक्ते श्री दासरी प्रसाद यांच्या हस्ते  प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.  सौ. गिरमे पूनम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  सौ देशपांडे मेघना यांनी वक्ते श्री दासरी प्रसाद यांचा परिचय करून दिला. प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री भारमळ सर यांच्या हस्ते पुस्तक देऊन वक्ते श्री दासरी सरांचे स्वागत  करण्यात आले.  सरांनी आपल्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांचे बालपण ,स्वराज्य स्थापना त्यांचे प्रजा हितदक्ष कार्य याबद्दल सखोल माहिती दिली.

आम्ही गड्या डोंगरचे राहणार ठाकर शिवबाचे होणार हे गाणे तालासुरात विद्यार्थ्यांनी वक्त्यांसोबत म्हटले. इ 7वी शिवनेरी या वर्गातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व मावळे यांच्या पेहरावात जोशपूर्ण पोवाडा सादर केला. शिवजयंती उत्सवानिमित्त प्रशालेत घेतलेल्या चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व गटातून प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे याप्रसंगी कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ देशपांडे स्वप्नाली यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथि

मराठी राजभाषा दिन

म ए सो सौ विमलाबाई गरवारे , प्रशाला डेक्कन जिमखाना पुणे - 04.

आज दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी  प्रशालेत मराठी राजभाषा दिन व कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस  उत्साहात पार पडला . या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती अनघा ठोंबरे व  श्रीमती लता त्र्यंबके मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या .तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. भारमळ सर यांनी भूषविले.पाहुण्यांचा परिचय  प्रीती घोरपडे या प्रशालेतील विद्यार्थिनींनी करून दिला.. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत  प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री  भारमळ सर यांनी केले .व पर्यवेक्षिका पवार मॅडम यांनी   श्रीम.लता त्र्यंबके मॅडम यांचे स्वागत केले.

 प्रशालेच्या विद्यार्थिनी समृद्धी जोरी व सुकन्या अडागळे यांनी कवी कुसुमाग्रजांची माहिती व राजभाषा दिनाची माहिती  सांगितली .

तसेच रितिका कोरे  विद्यार्थिनीने कवितेचे अभिवाचन केले. मराठी  बोलीभाषा दर कोसावर बदलते हे दर्शविणारे नाटक इयत्ता पाचवी व सहावीतील विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी सादर केले. पाचवीतील विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले .

त्यानंतर इयत्ता आठवी व  नववी मधील विद्यार्थ्यांनी  कुसुमाग्रजांच्या वेगवेगळ्या कवितांचे सादरीकरण केले.

 प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये  विद्यार्थ्यांना मराठी भाषेमध्ये कविता रचण्यास उद्युक्त केले . विद्यार्थ्यांना रोजचा दिवस आनंदात जगा हा मोलाचा संदेश दिला. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .भारमळ सर यांनी त्यांच्या अनमोल मार्गदर्शनामध्ये मातृभाषा शुद्ध स्पष्ट असायला हवी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले .

अशा प्रकारे आज प्रशालेमध्ये मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पडला या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील जान्हवी केंगार व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सेजल केकान या विद्यार्थ्यांनी केले.,

राष्ट्रीय विज्ञान दिन

   

 म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमाची सुरुवात सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षांना पाणी घालून वृक्ष संवर्धनाचा संदेश देत झाली.

   राष्ट्रीय विज्ञान दिन या कार्यक्रमासाठी विज्ञान भारतीचे श्रीकांत कुलकर्णी, आनंद भावे, पराग गोरे, प्रशालेचे माजी विद्यार्थी विश्वास काळे, विलास रबडे आणि त्यांची  टीम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री भारमळ सर, पर्यवेक्षिका मा. मार्गसिद्धा  पवार मॅडम उपस्थित होते.

     याप्रसंगी इ. सहावी शिवनेरी मधील विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर केले.

      प्रशालेचे मा.  मुख्याध्यापक श्री भारमळ सर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

      कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री भारमळ सर, मा. पर्यवेक्षिका सौ. मार्गसिद्धा पवार मॅडम यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकांत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना PPT द्वारे विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले.

       कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री आनंद भावे यांनी विद्यार्थ्यांना चुंबकत्व याविषयी माहिती सांगितली.

        सौ. रसिका लिमये यांनी विद्यार्थ्यांसाठी चुंबक या विषयावर प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. अचूक उत्तरे देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास श्री विलास रबडे आणि त्यांचे सहकारी यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आले.

      श्री. विलास काळे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी व शिक्षकांसाठी पुस्तके भेट दिली.

      श्री.पराग गोरे सरांनी box of science च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी  चुंबकीय कार  तयार करण्याविषयी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये चुंबकाच्या विविध गुणधर्मांवर आधारित ही कार चालते हे  विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष  कृतीतून अभ्यासले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  सौ. मेघना देशपांडे मॅडम यांनी केले.