रक्षाबंधन

 आपला भाऊ राया सुखी असावा त्याने आई-वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा असे प्रत्येक विवाहित बहिणीला वाटत असते तर आपली बहिण शिकावी मोठेपणी चांगल्या घरी जावी तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीबद्दल वाटत असते भाऊ

 भाऊ बहिणीच्या या प्रेमाला उधाण येतं ते राखी पौर्णिमेला या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते  या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते व भावाच्या आयुष्यात सुख शांती लाभू दे अशी प्रार्थना करते तर भाऊ सुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी आठवणीने राखी बांधून घेतो राखी बांधल्यानंतर बहिण मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करते तर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देवून खुश करतो या या दिवशी श्रावणी करणे हा प्रकार असतो श्रावणी करणे म्हणजे मन शुद्ध करणे

 बहिण भावाचे नाते दृढ करण्यासाठी मित्रत्व स्नेह व परस्परांवरील प्रेम वृद्धीगंत करण्यासाठी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो

जय हिंद , जय महाराष्ट्र

 , जय भारत !

श्री कृष्ण जन्म

 

हिंदू धर्मात इतके सण व उत्सव आहेत कि सारे वर्ष कसे संपते हे कळत सुद्धा नाही भारतीय संस्कृतीने गुणांचा गौरव केला आहे त्यात कोणत्याच प्रकारचा भेद ठेवलेला नाही पशु पक्षी प्राणी वृक्ष यांच्या गुणांचा गौरव करून त्यांना सन्मानित केले आहे अशा या सणांमध्ये स्त्रियांचा सहभाग जास्त असतो परंतु गोकुळाष्टमी व दहीहंडी हा मुलांचा पुरूषांचा उत्सव आहे श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्णाला विष्णूंचा अवतार समजतात ते कृष्ण भारतीयांच्या आवडते दैवत आहे मथुरा पुरी गोवर्धन वृंदावन बनारस याठिकाणी जन्माष्टमीच्या उत्सवाचा आनंदाचा जल्लोष पाहावयास मिळतो सर्वच लोक हा दिवस महत्वाचा मानतात कृष्ण मंदिराबरोबरच विष्णूच्या मंदिरातही हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाच्या वेळी पूजा प्रवचन भजन कीर्तन मंत्रघोष अशा विविध कार्यक्रमांनी दिवस रात्र कशी संपते हे कळतही नाही नवमीला गोविंदा आला रे आला म्हणत दहीहंड्या फोडल्या जातात थंडीच्या खापर या गाईच्या गोठ्यात पुरून ठेवल्या की गाय जास्त दुध देते अशी भावना आहे

 कृष्ण गोकुळात दह्या-दुधाने वाढला गोर गरीब लोकांच्या व सवंगड्यांच्या बरोबर खेळला सुदामाचे पोहे आवडीने खाल्ले म्हणून नवमीला दही पोह्यांचा प्रसाद वाटला जातो गोविंदा रे गोपाला च्या तालावर तरुण मुले नाचत गात मिरवणूककाढतात

 भगवत गीता हे जीवनाचे सार आहे 5000 वर्ष होऊन सुद्धा श्रीकृष्ण विसरला जात नाही जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा श्रीकृष्णाची आठवण होते दुर्जनांचा नाश सज्जनांचे रक्षण व मानव धर्माची स्थापना करणाऱ्या या भगवंताला लोक मनोभावे  पूजतात

 

श्री गणेश चतुर्थी

 आपण कुठल्याही कार्याचा शुभारंभ विघ्नहर्ता गणपतीच्या स्मरणाने करतो त्यावेळी आपण श्रीगणेशा केला असेही म्हणतो गणपती ही देवता वेदकाळात ही खुजली जात होती आपल्या धर्मात अनेक देवदेवता आहेत त्यात काही प्राचीन तर काही अर्वाचीन आहेत त्यात श्री गणेश विष्णु शंकर भवानी देवी व नारायण म्हणजे सूर्य या पाच देवतांनी आहे या पंच देवता भारतीय संस्कृतीच्या प्रतिनिधी देवता मानल्या जातात श्री गणेश फार प्राचीन देवता असून वरील देवता वैदिक व अवैदिक समाजाचा मिलाफ साधणाऱ्या पुण्य देवता आहेत श्री गणपती हे भारतीय संस्कृतीचे मंगलमय प्रतीक आहे

 भाद्रपद शुद्ध चतुर्थीस श्री गणेशाचे आगमन होते म्हणून या चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात ब्राह्मणापासून   शुद्रा पर्यंत सर्वच वर्णाचे लोक या देवतेची पूजा करतात या देवतांची पूजा विघ्नहर्ता मंगलमूर्ती म्हणून केली जाते त्यांच्या कृपा प्रसादाने सुबुद्धी व सुविधा यांचा लाभ होतो असे मानतात शुभ कार्यात विघ्ने येऊ नयेत कार्य निर्विघ्न पडणे यासाठी कार्याच्या आरंभी विघ्नहर्त्या गजाननाची प्रार्थना केली जाते गणेश हा गुणांची विद्येची देवता आहे तो ज्ञानमय आहे त्याच्या मूर्तीत सारे शब्द ब्रह्म एकवटलेले असून अठरा पुराणाचे अलंकार धारण केले आहे

 अशा या गणेशाचे रूप आगळे वेगळे आहे त्याला हत्तीचे डोके आहे याचाच अर्थ असा की तो विद्येचा सागर व श्रेष्ठ विद्वान आहे त्याचे कान सुपा येवढे मोठे आहेत याचा अर्थ तो बहुश्रुत आहे डोळे बारीक आहेत म्हणजे कोणत्याही गोष्टींचे निरीक्षण बारकाईने तो करतो इतकी विविधता कोणत्याही  देवतेत आढळत नाही.

 नवरात्र

 अश्विन हा पावसाळ्यातील शेवटचा महिना हस्ताचा सरी कोसळतात परंतु त्यातील तीव्रता कमी झालेली असते आजूबाजूची हिरवीगार सृष्टी पाहून मन प्रसन्न होते निसर्गाच्या सौंदर्याची उधळण पाहण्यात वेगळाच आनंद असतो अशा वेळी शरद हृतुचे आगमन होते धरणी माते बरोबरच सर्व जण सुखावले ले असतात अशा या महिन्यात अनेक उत्सव बरोबर नवरात्र येते

 वेद काळात परमेश्वर मंत्र स्वरूपात होता जसा जसा मानव शिल्पकलेत प्रावीण्य मिळवू लागला तसं तसा देव-देवतांना मूर्ती स्वरूपात घडवून त्यांची अनेक रूपे तो प्रामाणिकपणे लागल्याचे दिसून येते

 भारत वर्षाच्या संस्कृतीत इतिहासामध्ये पुराण काळ हा दैवत दृष्ट्या व उपासना दृष्ट्या अत्यंत समृद्ध काळ मानला जातो तेव्हा आधी शक्तींना मातृका शक्ती मानून त्यांचे पूजन सुरु झाले देवी शक्ती दुर्गा भवानी रेणुका काली अंबा महालक्ष्मी सरस्वती संतोषी चामुंडा कालिका एकविरा वज्रेश्वरी व जीवदानी इत्यादी विविध नावांनी  असली