महाराष्ट्रमध्ये कर्जत व नेरळ याच्या मध्यभागी वनवाडी हे एक वनक्षेत्र आहे.
Coordinates 19°03'53.0"N 73°23'11.1"E
वनवाडी पाहोचण्याचे मार्गदर्शन पत्रक :
१. रेल्वे - जर तुम्ही मुंबईहून सेन्ट्रल ने येत असला तर नेरळ स्टेशनवर. हे स्टेशन कर्जत स्टेशन च्या दोन स्टेशन आधी आहे.
२. पुण्याला जाणारी डेक्कन एक्स्प्रेस हि घेऊ शकता. हि ट्रेन मुंबई CST वरून ७ वाजता निघते,दादर वरून ७. १५ ला निघते. हि ट्रेन ठाणे व कल्याण इथे हि थांबते. नेरळ ला हि ट्रेन ८. ४० ला पोचते. सहसा या ट्रेन मध्ये गर्दी कमी असते. या व्यतिरिक्त मुंबई CST वरून दर तासाला कर्जत किंवा खोपोली साठी ट्रेन्स आहेत. या सर्व ट्रेन्स नेरळ ला थांबतात. CST ते नेरळ अंतर १ तास २० मिनिटे आहे.
३. पुण्यावरून येताना - पुण्यावरून मुंबई तर्फे येणारी कोणतीही ट्रेन व कर्जतला उतरा. ज्या प्लाटफोर्मवर तुम्ही उतराल त्याच्या समोरच्या प्लाटफोर्मवर नेरळला जाणारी लोकल ट्रेन येते. कर्जत ते नेरळ अंतर केवळ १० मिनिटाचे आहे.
४. नेरळ स्टेशन वरून बस स्टेन्ड ५ मिनिटे दूर आहे. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर ज्या प्लाटफोर्मवरउतराल त्याच बाजूने बस स्टेन्ड साठी बाहेर जायचे.
५. नेरळ बस स्टेन्ड वरून गाडी किंवा रिक्षाने येत असाल तर उल्हास नदीचा पूल पार केल्यावर लगेच एक तिरका रस्ता उजवीकडे दिसेल. या रस्त्याच्या बाजूला 'भारत एज्युकेशन सोसायटी (माथेरान व्हेली हायस्कूल) चा इंग्रजीमध्ये लिहिलेला बोर्ड दिसेल. याच रस्त्याच्या समोरच्या बाजूला 'सगुन बागेचा' बोर्ड आहे . या रस्त्यावर उजवीकडे गेल्यावर वान्जारपाडा व देवपाडा हे दोन गाव लागतील. देवपाड्यापासून वनवाडी ३ कि.मी. दूर आहे. वनवाडीला पोचण्यआधी'चिंचवाडी' नावाचे एक छोटे आदिवासी गाव दिसेल. रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी 'व्हिस्परींग वूड' (whispering wood ) चे बोर्ड दिसेल. वनवाडी चे जंगल व्हिस्परींग वूड च्या थोडे आधी आहे . नेरळ बस स्टेशन वरून वनवाडी १० कि.मी. अंतरावर आहे.
देवपाड्या पर्यंत येणाऱ्या सर्व रिक्षावाल्यांना ‘वनवाडी’ माहित आहे व ते तुम्हाला आत असलेल्या तलावापर्यंत आणून सोडू शकतात. नेहमी येणाऱ्या ऑटो ड्रायव्हर नंदू चा फोन नो. – ९२६००६८९५७ आहे. पूर्ण ऑटो बुक केल्यास रुपये २५० द्यावे लागतील. ऑटो मध्ये ८-१० लोक येऊ शकतात. दुसरा पर्याय देवपाड्या पर्यंत शेर ऑटो मध्ये यायचे व तेथून वनवाडी पर्यंत चे १३५ रुपये लागतील.
६. मुंबईहून गाडीतून येताना – जुन्या मुंबई पुणे हायवे वरून कर्जत चौकात डावीकडे वळावे. जर तुम्ही नवीन मुंबई पुणे एक्स्प्रेस वरून येत असाल तर कर्जत – खोपोली साठी पनवेल बाईपास वर डावी कडे वळावे. हा रस्ता तुम्हाला जुन्या मुंबई – पुणे हायवे वर पोहोचवेल.
कर्जत चौकापासून ७ कि.मी. पुढे आणि कर्जत पोहोचण्या थोडे आधी उल्हास नदीचा पूल तुमच्या डावीकडे दिसेल. त्या पुलावरून पुढे आल्यास डावीकडे वळा व १८ कि.मी अंतरावर कशेळे गाव लागेल. कशेळे वरून डावीकडे वळा. ८ कि.मी. अंतरावर वारे गाव लागेल. एक हैन्ड-पंप (hand-pump) दिसेल. त्याच्या बाजूला छोटा रस्ता दिसेल. इथे डावीकडे वळा. १.५ कि.मी. अंतरावर एक ग्रीलचे गेट दिसेल. त्यावर ‘वनवाडी’ लिहिलेले आहे. इथून थोडे पुढे आल्यावर एक नाला ओलांडल्यावर 'व्हिस्परींग वूड' चे बोर्ड दिसेल. इथे एका दगडावर ‘वनवाडी’ लिहिलेले दिसेल. आपल्या गाडीला ‘पार्किंग जोन’ पर्यंत आणू शकता. या नंतर ५ कि.मी. पाऊलवाटेने चालल्यास उजवीकडे एक तलाव दिसेल व समोर एक घर. तुम्ही पोचलात, स्वागत आहे.