शब्दकोडे - सूचना व माहिती
युट्युब विडिओ पहा - शब्दकोडे कसे तयार करायचे?
नवीन शब्द भरण्यासाठी चौकोन निवडा. त्यासाठी तुमचा शब्द जिथून सुरु होणार आहे त्या चौकोनावर टिचकी मारा. मग उभे किंवा आडवे चौकोन पिवळ्या रंगात दिसतील. दिशा बदलण्यासाठी त्याच चौकोनावर पुन्हा एकदा टिचकी मारा. तुमचा शब्द व त्याचा सुगावा वरील चौकोनात लिहा आणि एंटर बटनावर टिचकी मारा. (जर त्या चौकोनापासून सुरु होणार आडवा किंवा उभा शब्द अगोदरच भरला असेल, तर चौकोन रंगीत होणार नाहीत.)
भरलेल्या शब्दामध्ये किंवा सुगाव्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्या सुगाव्यावर टिचकी मारा. मग तो शब्द आणि सुगावा त्यांच्या चौकोनात (इनपुट बॉक्स) दिसतील. त्यामध्ये दुरुस्ती करा आणि एंटर बटनावर टिचकी मारा.
भरलेला शब्द व सुगावा काढून टाकण्यासाठी त्या सुगाव्यावर टिचकी मारून तो निवडा. मग एंटर बटनाशेजारील खोडरबराच्या चिन्हावर टिचकी मारा. तो शब्द व त्याचा सुगावा कोड्यातून काढून टाकला जाईल.
सर्व शब्द व सुगावे भरून झाल्यानंतर कोड्याच्या खाली असलेल्या ‘सबमिट’ बटनावर टिचकी मारा. आपल्याला एक विशिष्ट लिंक मिळेल. आपण इतरांना शब्दकोडे खेळण्यासाठी हि लिंक द्या.
हे हुशार शब्दकोडे असून यामध्ये चौकोनांसाठी जाड व पातळ अश्या सीमारेषांचा वापर केला आहे. एकाच शब्दांमधील अक्षरांसाठी पातळ सीमा, तर भिन्न शब्दांमधील अक्षरांसाठी जाड सीमारेषा वापरली आहे. आपण शब्द भरल्यानंतर आपोआप त्यांची जाडी बदलली जाते. यामुळे कोड्याला जास्त लवचिकता येते व शेजारी-शेजारी शब्द देता येतात. यामुळे कोडे तयार करणाऱ्याला शेजारील शब्द अर्थपूर्ण करण्याची गरज भासत नाही. तयार करणार्याने केवळ सामायिक चौकोनात एकसमान अक्षर येईल हे पाहायचे आहे. अर्थात तसे झाले नाही तर कोडे तुम्हाला इशारा देते.
या कोड्यातील तुम्ही भरलेले सर्व शब्द व सुगावे लिंक मध्ये साठवले जातात. या लिंकच्या लांबीला मर्यादा आहे. प्रत्येक नवीन शब्द भरल्यानंतर तयार होणाऱ्या लिंकची लांबी तपासली जाते. जर हि लांबी मर्यादेपेक्षा जास्त झाली तर इशारा दिला जातो. मग काही सुगव्यांची लांबी कमी करून किंवा एक शब्द काढून टाकून शब्दकोडे सबमिट करता येते.
शब्दकोड्याचा आकार हा जास्तीत जास्त ९x९ असू शकतो. परंतु याच आकाराचे कोडे तयार करण्याचे बंधन नाही. आपण छोटे कोडे सुद्धा तयार करू शकता. केवळ आपण भरलेल्या चौकोनांच्या आकाराचेच शब्दकोडे तयार होते. (उदा. आपण ३x३ चे चौकोन भरले, तर त्याच आकाराचे कोडे तयार होईल.)
शब्दकोडे मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये तयार करता येते. तुम्ही कोणत्या भाषेत
सुगव्यांच्या यादीमधून इच्छित सुगाव्यावर टिचकी मारून तो निवडा. तो सुगावा, त्या शब्दाशी निगडित चौकोन निवडले जातील व ते पिवळ्या रंगात दिसतील. मग, शब्दाच्या चौकोनामध्ये आपला शब्द टाका व एंटर बटनावर टिचकी मारा. आपण भरलेला शब्द वैधतेच्या चाचण्या पार करू शकला तर त्याची अक्षरे निवडलेल्या चौकोनात दिसू लागतील. जर काही कारणास्तव शद्ब स्वीकारता येत नसेल, तर योग्य तो इशारा दाखविला जातो.
शब्द दुरुस्त करण्याची प्रक्रिया हि नवीन शब्द भरण्यासारखीच आहे. सुगावा निवडा व शब्दाच्या चौकोनात दुरुस्त केलेला पूर्ण शब्द लिहा. जुन्या शब्दातली अक्षरे पुसून नवीन अक्षरे चौकोनांमध्ये दिसू लागतील.
शब्दाच्या सुगाव्यावर टिचकी मारून त्याची निवड करा. मग एंटर बटनाच्या शेजारील खोडरबराच्या चिन्हावर टिचकी मारा. तुम्ही भरलेला शब्द काढून टाकला जाईल.
आपल्याला येत असलेले सर्व शब्द भरून झाल्यावर ‘तपासणी करा’ या बटनावर टिचकी मारा. हे बटन शब्दकोड्याच्या खाली हिरव्या रंगात आहे. बरोबर अक्षरे हिरव्या रंगात तर चुकीची अक्षरे लाल रंगात दिसतील. त्यानंतर आपण चुकीची अक्षरे दुरुस्त करू शकता. आपणास तपासणीच्या तीन संधी उपलब्ध असतील.
तपासणीच्या सर्व संधींचा वापर करून झाल्यावरच उत्तर पाहता येईल. संपूर्ण कोड्याचे उत्तर दिसेल व त्यानंतर कोडे पुनः भरता येणार नाही.
आपण भरलेले कोडे इतरांसोबत शेअर करण्यासाठी दवंडीचा उपयोग करा. संपूर्ण कोडे भरून झाल्यावर खोडरबरशेजारील लाऊडस्पिकर च्या चिन्हावर टिचकी मारा. दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी केली जाईल. आपण ती इच्छित स्थळी चिकटवू शकता.